in

114 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत… दुसऱ्या डावात अश्विनचे सहा बळी

लोकशाही न्यूज नेटवर्क

चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन याने सर्वाधिक ६ बळी घेतले. अश्विन यानं पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत ११४ वर्षापूर्वींचा विक्रम मोडीत काढला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मागील ११४ वर्षांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. पण चेन्नई कसोटी अश्विनने पहिल्या चेंडूवर बळी घेत विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर अश्विननं हा मान पटकावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CA परीक्षेचा निकाल जाहीर, मोबाईलवर असा पाहा निकाल

IND Vs ENG: भारतासमोर ३८१ धावांचं आव्हान… सामना निर्णायक टप्प्यावर