in

जळगावमध्ये पोलिसांकडून व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

महेश जोशी | जळगाव | दिवाळी सण जवळ आला आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढली असून दुकानदारांची चांगलीच धावपळ झाली आहे. त्यावेळी पोलिसांनी अनेक दुकानात जाऊन मास्क न घालण्या प्रकरणी कारवाई केली. दरम्यान दुकानदारांनी पोलिसांना चांगलाच सुनावलं आहे.

दिवाळीसाठी अनेक ग्राहक खरेदीला दुकानात येतात आणि दुकानदार मात्र मास्कचा वापर करत नाही. आणि यामुळे पोलिसांनी दुकानात जाऊन दुकानदारांवर दंडात्मक कारवाही केली असता, अनेक दुकानदार एकत्र येऊन पोलिसांना चांगलाच सुनावलं आहे. ”तुम्ही पोलीस ठाण्यात जावून बघा कोण मास्क लावत का? हॉकर्स व फुटपाथवर व्यवसाय करणारे मात्र कोणीही मास्कचा वापरत करत नाही? पोलीस केवळ व्यापारी संकुलातील व्यवसायिकांना टार्गेट करून आर्थिक वसुली करत असल्याचा व्यावसायिकांचा आरोप. तरी मास्क नसल्याचे कारण देत पोलिसांनी दंडात्मक कार्यवाही केली. त्यानंतर पोलिस कारवाईचा व्यावसायिकांनी तीव्र निषेध केला. कार्यवाही दरम्यान पोलीस व्यावसायिकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचीही घटना घडली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सांगलीत दत्त इंडियाने केली एक रकमी एफआरपी जाहीर

आर्यन खानला जामीन मिळाल्या नंतर; बॉलिवूड अभिनेता आर माधवनने केलं ट्वीट