in

पुणेकरांचा थेट मोदींनाच सवाल; लसीसाठी 80 हजार कोटी आहेत का?

Share

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सर्वजण कोरोनाच्या लसीची वाट पाहत आहेत. यातच आता सीरन इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी भारतातील प्रत्येकाला कोरोनाची लस देण्यासाठी सरकारकडे पुढील वर्षभरात ८० हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतील का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. या प्रश्न त्यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. हा प्रश्न विचारताना ते असे देखिल म्हणाले आहेत की, हा निधी उभा करण्यासाठी मोठे आव्हान आपल्यासमोर असेल . अशा प्रश्नाचे ट्विट त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रिय आरोग्य कार्यालय यांना टॅग केलं आहे.
सीरम ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. याच सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड , कोडाजेनिक्स आणि नोव्हावॅक्स या तीन लसींचे उत्पादन करण्यात येणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सीरम इन्स्टिट्यूटकडे लागले आहे.
या ट्विटनंतर पुनावाला यांनी हा प्रश्न विचारण्याचे कारण सांगितले आहे की, मी असा प्रश्न विचारला कारण भारतासह भारताबाहेरील लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत देशाची आवश्यकता आणि त्यानुसार लागणारे उत्पादन आणि त्याचे वितरण याचे नियोजन करावे लागणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Jaswant Singh Passed Away;माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे निधन

पश्चिम रेल्वेनं घेतला मोठा निर्णय, महिलांच्या मदतीसाठी धावळी रेल्वे