in

Pune Metro | अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडली पुणे ट्रायल रन

गेल्या काही महिन्यांपासून पुणे मेट्रोच्या वेगवेगळ्या टप्प्यांची कामं समांतर पद्धतीने करण्यात येत आहेत. याआधी वनाज ते रामवाडी या भागाची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आता वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्याची चाचणी करण्यात आली. या टप्प्यातील मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. चाचणीनंतर ऑक्टोबर अखेपर्यंत मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे महामेट्रोच्या विचाराधीन आहे.

वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके अंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय या मेट्रो मार्गिके ची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. एकूण पाच किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे. या मार्गावर मेट्रोने सरावपूर्व चाचणी घेतली होती. ही मार्गिका उन्नत असून रूळ टाकण्यासह विद्युत तारांची कामे पूर्ण झाली असून मार्गिके अंतर्गत काही मेट्रो स्थानकांची कामेही पूर्ण झालेली आहेत.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट अखेपर्यंत वनाज ते रामवाडी या मार्गिकेचा काही भाग सुरू करण्याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा आग्रह आहे. टाळेबंदी असतानाही महामेट्रोने या मार्गावरील कामे वेगाने सुरू ठेवली होती. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिके वर मेट्रो धावण्याची चाचणी घेण्यासही प्राधान्य देण्यात आले होते. यापूर्वी पिंपरी चिंचवडमधे महामेट्रोने मेट्रोची यशस्वी चाचणी घेतली होती. ही चाचणी घेतल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही टप्प्यातील मेट्रो मार्ग प्रवासी सेवेसाठी सुरू करण्याचे विचाराधीन आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांची कामे सुरू आहेत. या दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३२ किलोमीटर एवढी आहे. यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका शेतकी महाविद्यालयापर्यंत उन्नत आणि तेथून पुढे स्वारगेट पर्यंत भूमिगत आहे. भूमिगत मेट्रो मार्गिके चे कामही वेगात सुरू आहे. भूमिगत मेट्रो मार्गिके साठी बोगदा निर्मितीचे काम कृषी महाविद्यालयापासून कसबा पेठेपर्यंत पोहोचले आहे. स्वारगटेपासून कसबा पेठेपर्यंतचे कामही सुरू झाले आहे. नदीपात्राखालूनही महामेट्रोने भूमिगत मार्गिके साठी बोगदा निर्मिती करण्याचा आव्हानात्मक टप्पा पूर्ण के ला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावती महानगरपालिकेत मनसेची लाथाबुक्क्यांनी तोडफोड आंदोलन

मिरचीला भाव न दिल्याने व्यापारी-शेतकऱ्यांमध्ये राडा