in

पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

Share

दौंड- विनोद गायकवाड | पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा जागीच तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडी वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

चार चाकी गाडी पुण्याहून सोलापूरच्या दिशेने चालली होती वरवंड गावा जवळ गाडी वरील नियंत्रण सुटल्यानंतर गाडी पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असणार्‍या काटेरी झुडपात गेली यामध्ये गाडीतील वाहन चालक राजेंद्र शंकर हा जागीच ठार झाला तर नंदकुमार शंकर जठार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.हे दोघे लोणी काळभोर मधील राहणारे होते दोघा सख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.गाडीचा वेगावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

फुटबॉल जगतातला ‘हा’ दिग्गज खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

महावितरणाची वाघीण; लाईटच्या खांबावर चढून करते तारांची जोडणी