in

पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीचं वादन थांबवलं

आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येत असून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीही गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडलं आहे. पुण्यात मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीचं ढोल-ताशा वादन सुरू असताना पोलिसांनी वादन करू नये यासाठी त्यांच्याजवळील साहित्य काढून घेतलं होतं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये काहीसा वाद झाला. अखेर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यावर साहित्य परत देण्यात आले.

नक्की काय झालं –
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन केलं जात आहे. सकाळी ११ वाजता कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन केलं जाणार होतं. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जाहीर करण्यात आली होती. यावेळी तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलीस तिथे पोहोचले आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचं साहित्य जप्त केलं. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परवानगी नसतानाही वादन केले जात असल्याने कारवाई केल्यानंतर गोंधळ उडाला.

दरम्यान तुळशीबाग गणपती मंडळाने पोलिसांनी कारवाई केली नसून फक्त समज दिली असल्याचं म्हटलं आहे. “आमच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली नाही. पोलिसांनी समज दिलेली आहे,” अशी माहिती मंडळाचे खजिनदार नितीन पंडित यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मिरा भाईंदर सूर्या पवार यांच्या गणपती बाप्पा च दर्शन घेताना सोबत प्रदीप जंगम व सोनाजी कांबळे.

धक्कादायक ! कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात अडकलं किट, तडफडून मृत्यू