in

सुधीर मुनगंटीवारांच्या अडचणी वाढणार; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समिती गठीत

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजच्या शेवटच्या दिवशी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात राबविलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी समिती जाहीर करण्यात आली. या प्रकरणात चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून, या समितीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, निलेश राणे आदींचा समावेश आहे. दरम्यान या समितीला चार महिन्यांत अहवाल द्यायचा आहे.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची मोहिमेची माहिती शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी दिली होती. या मोहिमे संदर्भात काही खुलासे काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य नाना पटोले यांनी सुद्धा केले. जवळपास २५ टक्के झाडे जगलेली नाहीत. अनेक ठिकाणी फक्त खड्डे खणले; पण लागवडच झाली नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. याकडे लक्ष वेधत विधिमंडळाच्या संयुक्ती समितीमार्फत या लागवडीची चौकशी करण्याची मागणी केली होती.

दरम्यान यावर बोलताना तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, ही वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे, ही वृक्षलागवड एक जनचळवळ बनली, असे सांगत मोहिमेचे यश अधोरेखित केले होते.

राज्यात राबविलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत केली होती. त्यानुसार आज यासाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीर करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष राज्यमंत्री दत्तात्रय भरणे असणार आहेत. या समितीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, निलेश राणे आदींचा समावेश आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन

YouTubers ना मोठा झटका…