in

“जोवर ताकद तोवर लढणार, १०० दिवस असो किंवा १००…” म्हणतं प्रियंका गांधी आक्रमक

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास आता १०० दिवस झालेले आहेत. मात्र अद्यापही हे आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आंदोलक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रतिक्रिया दिली आहे.

“आशा गमावू नका, १०० दिवस झाले आहेत. १०० आठवडे किंवा १०० महिने जरी लागले तरी जोपर्यंत सरकार हे काळे कायदे परत घेत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा तुमच्या साथीने सुरूच ठेवणार आहोत.” असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

या अगोदरही शेतकरी आंदोलनावरून प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे, शेतकरी १०० दिवसांपासून संघर्ष करत आहेत. २०० पेक्षा अधिक शेकतरी शहीद झाले आहेत. शेतकऱ्यांजवळ जाऊन चर्चा करणं हे सरकारचं कर्तव्य होतं. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या बलिदानाची थट्टा केली, शेतकऱ्यांचा अपमान केला. मी वचन देते की १०० दिवसंच काय १०० महिने जरी लागले तरी देखी मी शेतकऱ्यांसोबत उभी राहील. असं प्रियंका गांधींनी म्हटलेलं आहे.

‘हम दो हमारे दो’चं सरकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनपासून पाकिस्तान सर्व ठिकाणी फिरून आले. ‘हम दो हमारे दो’ मित्र सरकार चालवत आहेत. जे प्रकर्षानं दिसूनही येत आहे. सरकारला तुमचं ऐकावंच लागेल. अशा माहोल तयार करा की सरकार तुमच्या सुनावणीशिवाय सरकार पुढे जाऊ शकणार नाही, असंही त्या म्हणाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन

Gold Silver Rates : सोने-चांदी दरात घसरण