in

फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ टि्वट करत प्रियंका गांधींची टीका

राज्यात कोरोनावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. रेमडेसिवीर कंपन्यांना महाराष्ट्राला पुरवठा करू नका, असं धमकावण्यात आल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

दरम्यान, यानंतर एका व्यक्तीला औषध आणि इंजेक्शनची साठेबाजी प्रकरणात चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी ठाण्यात धाव घेतली होती. आता या संपूर्ण प्रकरणात प्रियांका गांधी वड्रा यांनी उडी घेतली आहे.

प्रियांका यांचा फडणवीसांवर निशाणा –

प्रियांका यांनी पोलीस ठाण्यातील तो व्हिडिओ टि्वट करत फडणवीसांवर थेट निशाणा साधला आहे. ‘ जेव्हा देशभरात लोक कानाकोपऱ्यातून रेमडेसिवीर मिळवण्यासाठी धडपड करताहेत, जीव वाचवण्यासाठी लोक एक इंजेक्शन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत, त्याचवेळी जबाबदारीच्या पदावर राहिलेल्या भाजपा नेत्यांचं रेमडेसिवीरचा साठा करण्याचं कृत्य मानवतेविरोधात आहे, असं प्रियांका यांनी टि्वट करून म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

saves passenger’s life | अंध चिमुकल्याचे रेल्वेच्या पॉईंट मॅनने वाचवले प्राण

Corona Virus| सोनू निगमचे वादग्रस्त विधान