in

Video;मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसला आग

Share

मुंबई : मुंबईगोवा महामार्गावर खासगी बसला लागली आग. विरारहून देवगडला जाणाऱ्या बसला अचानक आग लागली.  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे ही घटना घडली. स्थानिकांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आगीत बसचं पूर्ण नुकसान झालं आहे पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

बसमधून प्रवास करत होते 25 प्रवाशी. या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. मुंबई – गोवा हायवेवर खासगी प्रवासी बसला आग लागल्याची घटना सकाळी आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे पारेख पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली आहे. विरारहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे ही बस जात होती. यावेळी बसमध्ये 25 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान, आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशी सुखरूर बसमधून उतरले. यावेळी स्थानिकांच्या मदतीनं बसला लागलेली आग विझवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रवास करण्याकरता अनेक अटी पाळाव्या लागतात. अशावेळी अपघात झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Vikas Dubey Encounter ;पोलीस चकमकीत विकास दुबेचा एन्काऊंटर

Video; शेतकऱ्याच्या आयडियाची कल्पना; बनवले आधुनिक पद्धतीचे यंत्र