in

Prince Phillip: प्रिन्स फिलीप यांचे ९९ व्या वर्षी निधन… राजघराण्यावर शोककळा


राणी एलिझाबेथ(दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. बकिंगहॅम पॅलेसने यासंदर्भात सविस्तर माहितीचे पत्र जारी केले आहे. यामध्ये राी एलिझाबेथ त्यांचे पती प्रिन्स फिलीप, ड्यूक ऑफ एडिनबरा यांच्या दु:खद निधनाची बातमी जाहीर केली.

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही दुख व्यक्त केले आहे. प्रिन्स फिलीप हे तरुणांसाठी आशास्थान असल्याचं त्यांनी म्हटलंय.

राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि प्रिन्स फिलीप यांचं लग्न 1947 मध्ये झालं होतं. त्यांना चार मुले, आठ नातवंडे आणि दहा पतवंडे आहेत.

त्यांचे पहिले पुत्र प्रिन्स ऑफ वेल्स, प्रिन्स चार्ल्स यांचा 1948 मध्ये जन्म झाला होता, त्यांच्यानंतर त्यांच्या भगिनी, द प्रिन्सेस रॉयल, प्रिन्सेस ॲन यांचा 1950 मध्ये, 1960 साली ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांचा आणि 1964 साली अर्ल ऑफ वेलेक्स प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म झाला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

vaccination | देशात लसीकरण पूर्ण होईपर्यत, परदेशात पाठवू नका – अजित पवार

‘लसीचा तुटवडा असताना पाकिस्तानला पुरवठा का?; जयंत पाटलांचा पंतप्रधानांना सवाल