देशात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या मूलभूत आरोग्य सेवांपासून देखील वंचित आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद या क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरू शकते. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य क्षेत्रातील भरीव तरतूदीविषयी घेतलेल्या वेबिनारमध्ये आपली भूमिका मांडली. तसेच, देशाच्या आरोग्यव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन केलेली चतु:सूत्री देखील सांगितली.
काय आहे पंतप्रधानांची चतु:सूत्री?
‘भारताचं आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी आम्ही चार मुख्य गोष्टींवर काम करत आहोत’, असं मोदी म्हणाले. यामध्ये खालील चार गोष्टींचा समावेश असेल.
१) रोगप्रतिबंध आणि आरोग्याचा प्रसार
२) सर्वांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवणे
३) आरोग्य सुविधांसाठीची व्यवस्था तयार करणे आणि
४) आरोग्य क्षेत्रासाठी अधिक प्रमाणात आणि दर्जेदार मनुष्यबळ तयार करणे
स्वदेशी लशीच्या मागणीसाठी तयार राहायला हवं!
दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी ‘आपण मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या स्वदेशी लशीच्या मागणीसाठी तार राहायला हवं’, असं देखील सांगितलं. ‘आज, भारताच्या आरोग्य यंत्रणेवरचा जगाचा विश्वास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यासाठी स्वदेशी बनावटीच्या लशींची मागणी वाढू शकते, त्यासाठी आपण तयार राहायला हवं’, असं मोदींनी यावेळी सांगितलं.
Comments
Loading…