in

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी दोन वाजता पंतप्रधान मोदी ऐतिहासिक परेड ग्राऊंडवर जनतेला संबोधित करतील. या रॅलीत अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, अभिनेता प्रोसेनजीतसह आणखी काही बंगालमधील प्रमुख व्यक्ती भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी इंधन दरवाढीविरोधात सिलीगुडीमध्ये पदयात्रा काढणार असून ममता यांचा रोड शो आणि कोलकातामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली एकाच वेळी असणार आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तामिळनाडू आणि केरळच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. आज ते भाजपच्या डोअर टू डोअर मोहिमेची सुरुवात करणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगावात आज मराठा आक्रोश मेळावा

Petrol and Diesel price | अनेक दिवसांनंतर पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ नाही