कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांनी लॉकडाउन कायम ठेवण्याची केलेली मागणी या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते उद्या देशाशी साधणार संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबतच्या घोषणेकडे देशाचं लक्ष लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन उद्या म्हणजे १४ एप्रिलला संपत आहे. लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Comments
0 comments