in ,

मोदी 2.0 सरकारची वर्षपूर्ती; पंतप्रधान यांचे देशवासियांना पत्र

coronavirus, covid-19, lockdown, unlock, Maharashtra, maharashtrapolice, doctor, coronawarrior, unlock1, policeservice, कोरोनाशी लढा, कोरोना माहिती, लोकशाहीन्यूज, lokshahinews, lokshahi, lokshahimarathi, mumbai, uddhavthackeray, narendramodi,
coronavirus, covid-19, lockdown, unlock, Maharashtra, maharashtrapolice, doctor, coronawarrior, unlock1, policeservice, कोरोनाशी लढा, कोरोना माहिती, लोकशाहीन्यूज, lokshahinews, lokshahi, lokshahimarathi, mumbai, uddhavthackeray, narendramodi,
Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या कार्यकाळातील सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशवासियांना एक जाहीर पत्र लिहिले आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर पीएम मोदींनी 2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. ज्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. जनतेला लिहिलेल्या या पत्रात पंतप्रधानांनी गेल्या 1 वर्षात सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा देताना ते म्हणाले की, सरकारने पूर्ण सावधगिरीने, संवेदनशीलतेने काम केले आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना सांगितले की, गेल्या वर्षभरात तुमच्या आपुलकी, शुभेच्छा आणि सक्रिय सहकार्यामुळे मला सतत नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली.

या पत्रात मोदी यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय एकता-अखंडतेसाठी कलम 370 असेल, अनेक तपांच्या जुन्या संघषार्चा सुखद परिणाम राम मंदिर बांधायला परवानगी असेल, तीन तलाक असेल किंवा मग भारताच्या करुणेचे प्रतीक नागरिकत्व सुधारणा कायदा असेल, ही सर्व कामगिरी तुमच्याही स्मरणात आहे. त्यात कोरोना महामारीने भारतालाही विळखा घातला. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी दिलेले 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.

यावेळी मोदी यांनी पत्रात म्हटले की, गेल्या एका वर्षात भारताने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असून वेगाने विकास करत असल्याचे सांगताना स्थलांतरित मजूर, कामगारांचाही उल्लेख केला आहे. कोरोनाच्या संकटात या सर्वांना अपरिमित यातना सोसाव्या लागल्या असल्याचे मोदींनी म्हटले आहे. सोबतच मोदींनी यावेळी भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्था सुरळीत करून जगासमोर एक उदाहरण ठेवत ज्याप्रमाणे कोरोनाशी लढा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले तसेच पुन्हा एकदा करणार असल्याचेही सांगितले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पुण्यात रुग्णसंख्या वाढली! टेस्टींगच्या संख्येत वाढ…

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून अखेर बाहेर; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा