in ,

पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यातील कार्यक्रमांची माहिती दिली असून पंतप्रधान मोदी आज बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक शिखर संमेलनात सहभागी होतील.

या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि बायडन भारत-अमेरिकेतील संबंधांवर चर्चा करतील. तसेच या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करणे, सुरक्षेसंबंधी तसेच स्वच्छ ऊर्जा भागिदारीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजीत डोभाल आणि विदेश सचिव श्रृंगला देखील असणार आहेत.

या बैठकीमध्ये अफगाणिस्तान आणि सीमाभागातील अन्य मुद्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सीमापार दहशतवाद आणि कट्टरता यासारख्या मुद्द्यांवरही व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्र संघाची 76 व्या महासभेमध्ये अफगाणिस्तान, हवामान बदल आणि कोरोना बद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात पुढील २८ तास सर्वत्र वादळी पाऊस, काही भागात यलो अलर्ट

कोकणात गणेशोत्सवासाठी गेलेल्या 272 जणांना कोरोनाची लागण