लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या वर्षी मार्चपासून देशात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला. हा विषाणू आटोक्यात येतो की नाही, अशी चिंता लागली होती. परंतु सुदैवाने आता तो बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. याच अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत सांगितले की, ‘डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांच्या रुपाने देव पावला.’ तर, काँग्रेसेच नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, कोरोनाचे संकट आणून देशाला बर्बाद केले, त्यांना सद्बुद्धी दे, असे साकडे गणरायाला घातले आहे.
कोरोना महामारीच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले. परंतु देवाच्या कृपेने आपण बचावलो, असे काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले. त्याला उत्तर देतानान पंतप्रधान म्हणाले, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मृत्यूशी खेळत होते. मुलांना घरी ठेवून येत होते. त्यांच्या रुपात देव पावला.
तर दुसरीकडे नाना पटोले यांनी नागपूरमध्ये गणेश टेकडी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाचे संकट मानवनिर्मित आहे. मूठभर लोकांना श्रीमंत करण्यासाठी देशाची तिजोरी खाली करून सामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले, अशी टीका केली. ज्यांनी हे संकट आणले आणि या देशाला बर्बाद केले त्यांना सदबुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.
अंबानीचे उत्पन्न तासाला 90 कोटी होणे म्हणजे नरेंद्र मोदींचे सरकार कोरोनाच्या नावाखाली देशाला मूर्ख बनवण्याचे आणि देशाची तिजोरी लुटून कशी अंबानी आणि अदानीच्या घरात भरत होते. हे चित्र जनतेला कळले आहे. यामुळे बाप्पा हे संकट दूर कर, असे साकडे त्यांनी घातले.
Comments
Loading…