in

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची तब्येतीत बिघाड

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती शुक्रवारी सकाळी खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना आर्मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखी खाली आहेत.

‘छातीत दुखत असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांचे रुटीन चेकअप सुरु आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर आहे’, असं आर्मी रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
बांगलदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही बातमी कळताच त्यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या मुलाशी संपर्क साधला आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटवर आज भांडूपमध्ये झालेल्या आगीबद्दल दु:ख देखील व्यक्त केले.

3 मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोरोना व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पत्नीसह रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार ? देवेंद्र फडणवीस

gold and silver rate | पाहा सोने चांदी आजचा भाव