देशात महागाई झपाट्याने वाढत असताना ती नियंत्रणात आण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळेच सरकारला तर लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकार बोचरी टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
या ट्विटमध्ये एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ‘गेल्या तीन महिन्यांत गॅस सिलिंडची किंमत 225 रुपयांनी वाढली आहे’ अशा आशयाचं ट्विट केलं असून केंद्र सरकार नागरिकांवर क्रूरपणाने वागत आहे. सरकारला तर लाज वाटायला पाहिजे असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे. एलपीजीवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.
दरम्यान, देशात पुन्हा एकदा विनाअनुदानीत सिलिंडरच्या दरात 25 रूपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता घरगुती गॅसचे दर 794 रूपयांवरून वाढून 819 रूपये इतके झाले आहेत. तर मुंबईत सिलिंडरचे नवे दर 819 रूपये, कोलकात्यात 845.50 रूपये आणि चेन्नईमध्ये नवे दर आता 835 रूपये झाले आहेत.
Comments
Loading…