in

Prakash Ambedkar |’एक राजा बिनडोक तर दुसरा राजा…’ , प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

Share

मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असणार आहे. मात्र यावेळी OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. 10 ऑक्टोबरला मराठा आरक्षण समाजाने दिलेल्या बंदला ‘वंचित’चा पाठींबा असणार आहे. अशी माहिती वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही फटकारले. एक राजा बिनडोक आहे. संभाजी राजेंनी भूमिका घेतली आहे हे बरोबर पण ते इतर गोष्टींवर भर देतात. मी कुणाला अंगावर घ्यायला घाबरत नाही. आम्हाला आरक्षण नाही तर सर्वांचं आरक्षण रद्द करा अशी भूमिका घेणाऱ्याला भाजपने राज्यसभेत कसं पाठवलं , असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामंजस्य बिघडू नये म्हणून आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. सुरेश पाटील यांनी मला १० तारखेच्या मोर्चाला वंचितने पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली होती. या प्रश्नावरून मराठा संघटनांमध्ये वेगवेगळ गट निर्माण होण्याची शक्यता आहे. यापैकी काहीजण भविष्यात आक्रमक भूमिका घेऊ शकतात. परिणामी राज्यातील सामंजस्य बिघडण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण येत्या १० तारखेला आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

ते गुरुवारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची दक्षता घेतली जावी. दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकरांचं निधन

Bihar Election 2020:राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात, शरद पवार मुख्य स्टार प्रचारक