लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबाबत दाखल झालेली याचिका फेटाळली आहे.परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानं राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
याचिका फेटाळल्या नंतर परभणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासनाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. 23 फेब्रुवारील अर्जाची छाननी होणार आहे. 24 रोजी वैध नामनिर्देशनपत्राची यादी जाहीर केली जाईल. याबरोबरच 24 फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. उमेदवारांना 12 मार्चला निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 21 मार्चला मतदान आणि 23 मार्चला निकाल घोषीत केला जाणार आहे..
या पाश्वभूमीवर जिल्हा बँकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांनी पॅनल जुळवण्यासाठी तयारी सुरु केलीय. परभणी जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रात दोन जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळं परभणी आणि हिंगोलीमध्ये मतदान केंद्र असतील. परभणी आणि हिंगोली असं मिळून एकूण 15 केंद्रांवर मतदान होईल. परभणी, पूर्णा, जिंतूर, मानवत, पाथरी, सेलू, सोनपेठ, गंगाखेड आणि पालम येथे तर हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव येथे मतदान केंद्र असतील.
Comments
Loading…