in

Power cut|मुंबईतील वीजपुरवठा तासाभरात सुरळीत होईल; उर्जामंत्र्यांचे आश्वासन

Share

गेल्या काही तासांपासून मुंबई आणि लगतच्या परिसरात ठप्प असलेला वीजपुरवठा आणखी तासाभरात पूर्ववत होईल, असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. मुंबईसह इतर भागातील वीजपुरवठा एकाचवेळी खंडित झाल्याने सध्या गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.

महापरेषणच्या 400KV कळवा पडघा GSI केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरु होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील वीज गेल्याचेही नितीन राऊत यांनी सांगितले. यानंतर सर्किट 2च्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. आणखी तासाभरात वीजपुरवठा सुरळीत होईल, असेही राऊत यांनी म्हटले.

सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. तसेच इंटरनेटही बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली आहे. मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झालं. त्या सरकारी आणि खासगी कार्यालयातील काम ठप्प झालं. तर इंटरनेट ठप्प झाल्यामुळे मोबाईलमधून मेसेजही जात नव्हते. सोशल मीडियाही अचानक ठप्प झाल्याने मुंबईकर थोडावेळ गोंधळून गेले होते. दुसरीकडे वीज गेल्याने कार्यालयातील कर्मचारी कार्यालयाबाहेर आले होते.

या भागात वीज गायब

दादर , लालबाग ,परळ , प्रभादेवी , वडाळा , ठाणे , नवी मुंबई , पनवेल , बोरिवली , मालाड , कांदिवली , पेण , पनवेल , उरण , कर्जत , खालापूर

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Power Cut | मुंबईसह MMR परिसरात लाईट गुल, लोकलसेवाही विस्कळीत

Mumbai Power cut: रुग्णालयांना पुरेसा डिझेल साठा करण्याचे आदेश