in

Power Cut | मुंबईसह MMR परिसरात लाईट गुल, लोकलसेवाही विस्कळीत

Share

मुंबईच्या अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा या भागातील लाईट गेली आहे. ग्रिड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याचे समजते. याचबरोबर मुंबईची लोकल देखील जागच्या जागी थांबल्या आहेत.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील वीज पूर्णपणे गेली आहे. मुंबई शहराला वीज पुरवणाऱ्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात BEST च्या माहितीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रा वीज गेली आहे.
महापारेषणच्या 400 KVच्या कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट 1ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीज गेल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पनवेल या महानगर पालिका क्षेत्रातही वीज गायब झाली आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात (पॉवर ग्रीड) बिघाड झाल्याने वीज गेल्याची माहिती ‘बेस्ट’ने दिली आहे. या संदर्भात ‘बेस्ट’ने ट्वीट केले आहे. वीज पुरवठ्यातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, वीज गेल्यानं मुंबईतील अनेक सेवांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी “पॉवर ग्रीडमधील तांत्रिक बिघाडामुळे वीज गेलीय. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झालीय. मात्र, सेवा लवकरच पूर्ववत होईल. कुणीही गोंधळून जाऊ नका.” दिवा, रोहा आणि जेएनपीटी भागात डिझेलवर चालणारी रेल्वे सेवा सुरू असल्याचंही सुतार यांनी सांगितलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Rain Update | राज्यात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Power cut|मुंबईतील वीजपुरवठा तासाभरात सुरळीत होईल; उर्जामंत्र्यांचे आश्वासन