in ,

राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत आज निर्णयाची शक्यता

Share

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनचे आदेश राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. परंतु लॉकडाऊनमुळे शैक्षणिक वर्षासह बोर्ड परिक्षांचे वेळापत्रक बिघडले आहे. तसेच राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामध्ये काही मतभेद सुद्धा झाले आहेत. याच पार्श्वभुमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (30 मे) राज्यातील विद्यापीठातील कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत.

त्यामुळे आज राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि तंत्रमंत्री उदय सामंत यांनी असे म्हटले आहे की, आज दुपारी 12.30 वाजता उद्धव ठाकरे विद्यापीठातील सर्व कुलगुरुंशी व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. शिक्षण क्षेत्रावर कोरोनामुळे फार दूरगामी परिणाम झाला असून गेल्या दोन महिन्यांपासून शाळा-कॉलेजेस बंद आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. अंतर्गत गुणांकनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत वर्ग करण्यात आले आहे.

८ मे रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ‘अंतिम वर्ष’ वगळता इतर सर्व वर्षातील विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर परीक्षा रद्द करण्याचा निर्णयाची घोषणा केली. ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातील अंतर्गत मूल्यांकनाच्या बळावर ‘ग्रेड सिस्टम’च्या मदतीने पुढच्या सेमिस्टरमध्ये वर्ग करण्याचा हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह होता. विविध शिक्षण क्षेत्रातील तज्ञांनी आणि विद्यार्थी संघटनांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले होते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

दिल्ली पुन्हा भूकंपाने हादरली, गेल्या 50 दिवसांमध्ये बसले 5 धक्के!

शिक्षण विभागाचा अभ्यासक्रम कमी करण्याचा घाट, पण…