in ,

समोसा खात मिया खलिफाचा पुन्हा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

लोकशाही न्यूज नेटवर्क

पॉर्न स्टार मिया खलिफानं दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणखी एक टि्वट केलं आहे. मियाने एक व्हिडिओ टि्वट केला आहे. यात ती समोसा, गुलाबजाम असे भारतीय पदार्थ खाताना दिसत आहे. यावर लिहिलेल्या ओळीमधून ती टोमणा मारताना दिसत आहे. ‘वन गुलाब अ डे किप्स दी फॅसिजम अवे’ अशा शब्दात मिया खलिफानं टोला मारला आहे.

मिया खलिफा, ग्रेटा थनबर्ग, पॉपस्टार रियाना यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात टि्वट केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यानंतर भारतातील अनेक सेलिब्रेटींनी टि्वट करून देशाच्या एकसंघतेची बाजू घेत सरकारच्या समर्थनार्थ टि्वट केले. आमच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नको, असं अनेक सेलिब्रेटींनी म्हटलं. यानंतर आता पुन्हा टि्वट करून मिया खलिफाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं दर्शवलं आहे.

काय आहे टि्वट?

मिया खलिफानं टि्वट केलेल्या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. यात तिनं म्हटलं आहे की, या स्वादिष्ट जेवणासाठी रूपी कौर यांचे आभार आणि गुलाबजाम पाठवणाऱ्या जगमित सिंह यांचेही धन्यवाद. जेवण झाल्यावर स्वीट खाण्यासाठी माझ्या पोटात जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे मी जेवतानाच गोड पदार्थ खात आहे. असं म्हणतात की, दिवसात एका गुलाब कट्टरतावादाला दूर ठेवतो, असे मिया खलिफाने टि्वटमध्ये म्हटले आहे. टि्वटसोबत #FarmersProtests असा हॅशटॅगही तिने वापरला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘एमएसपी’वर कायदा बनल्यास शेतकऱ्यांना फायदा’ – राकेश टिकैत

सोन्याच्या किमतीमध्ये ९००० रुपयांची घट