टिकटॅाक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकणात आता थेट राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने पुणे पोलिसांकडून तपासाचा अहवाल मागवला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात आता राष्ट्रीय महिला आयोगाने इंट्री केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या आदेशानुसार पुणे पोलीस पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच पाठ्वण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणी पुणे पोलिसांचं तपास काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपकडून या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरतेय. त्यात आज संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे वृत्तही प्रसिद्धी माध्यमांत झळकत आहे. मात्र अधिकृत राजीनामा दिल्याची अधिकृत वृत्त नाही आहे. त्यात आता या प्रकरणावर संजय राठोड पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार आहेत.
Comments
Loading…