टीकटॅाक स्टार आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव चर्चेत येत आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे.दरम्यान या सर्व प्रकरणावर आता उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपानंतर संजय राठोड गायब असून त्यांना फोन नॉटरिचेबल येत असल्याची माहिती आहे. यावर अजित पवार यांनी संजय राठोड गायब नसून संपकार्त असल्याची माहिती दिली. तसेच राठोडांना संशयाच्या भोवऱ्यात टाकू नका असे बोलत त्यांनी विरोधक बदनामीसाठी आरोप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा योग्य तपास सुरु आहे. चौकशीत तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कुणालाही पाठीशी घालण्याचे कारण नसल्याचेही पवार यावेळी म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या प्रकणातही असचं झाल, विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप करण्यात आले. मात्र नंतर वेगळेचं सत्य समोर आले. त्यामुळे मुंडे संदर्भात लवकर निर्णय घेतला असता तर चुकीचे ठरले असते, असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान या प्रकरणात चौकशी झाल्यानंतरच कारवाई करण्यात येईल. शिवसेना यावर आपली भूमिका घेईल. तसेच संजय राठोड गुरुवारी पुढे येऊन याबाबत स्पष्टीकरण देतील असेही ते म्हणाले.
Comments
Loading…