in

पंजाबमध्ये राजकीय भूकंप , मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा!

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. या सर्व गोंधळात आता पक्षाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याचे आदेश दिले आहेत. याच कारणामुळे, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे.

” मी कॉंग्रेस पक्षाचा नेता आहे आणि कॉंगेस मध्येच राहणार. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता वेळ आल्यावरच योग्य तो निर्णय मी घेईन. पार्टच्या लोकांना माझ्यावर विश्वास नाही आहे. ज्या व्यक्तीवर पार्टीचा विश्वास असेल त्या व्यक्तीला मुखमंत्रीपद बहाल करावे.या संदर्भात मी माझ्या सामार्थाकांसोबत बोलेन. अशी प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

गेल्या काही महिन्यांत नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या आमदारांच्या एका गटाने अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारले असून नव्या नेत्याची मागणी केली आहे. सुनील जाखड़, पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रताप सिंह बाजवा आणि बेअंत सिंह यांचे नातू आणि खासदार रवनीत सिंह बिट्टू अशी नावे पंजाबच्या संभाव्य नवीन मुख्यमंत्र्यासाठी लढत आहेत. पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गोंधळा दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) शनिवारी राज्याच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा!

”आता तर चक्क कोथळा काढायची भाषा वापरली जाते”