in

वालधुनी नदीत बुडणाऱ्या युवकाला पोलिसांनी दिले जीवदान

कल्याण डोंबिवली शहरालगतच्या नद्यांना आलेल्या पुरामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. आज दुपारच्या सुमारास वालधुनी नदीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बाहेर काढत जीवदान दिले.

सलमान अन्सारी हा 24 वर्षीय युवक नशेत धुंद असल्याने तो पालिकेच्या गणेश घाट डेपोच्या मागील बाजूने नदीत उतरला. मात्र नदीच्या प्रवाहाबरोबर तो वाहत जाऊ लागला. शहाड येथील पुलाजवळ असलेल्या खांबाला तो अडकला. एक तरुण बुडत असल्याचे पाहुन नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोरीच्या साहाय्याने या तरुणाला पाण्यातून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलीस आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोहाडीचे तहसीलदार गजानन बोंबुर्डे यांना 30 हजार रुपयांची लाच घेताना अटक

Raigad Rain Fall | महाड आणि पोलादपूर दोन्ही तालुके अंधारात