in

PNB Scam: मेहुल चोक्सीवर ED ची मोठी कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार घोषित करण्यात आलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्या प्रकरणी गीतांजली ग्रुप आणि मुख्य आरोपी असलेला या ग्रुपचा प्रमुख मेहुल चौक्सीची ईडीने १४ कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. हा पीएनबी बँकेतील घोटाळा एकूण १३ हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.


मेहुल चौक्सी हा नीरव मोदीचा मामा असून नीरव मोदी हा १३ हजार कोटी रुपयांहुन अधिकच्या फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी आहे. नीरव मोदी सध्या लंडनमधील कारागृहात बंद आहे.

ईडीने काढलेल्या पत्रकात सांगितले आहे की, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मुंबईतील गोरेगाव परिसरातील ओ२ टॉवरमधील १४६० चौकिमीचा फ्लॅट, सोने आणि प्लॅटिनमचे दागिने, हीरे, चांदी आणि मोत्यांचे नेकलेस, घड्याळे आणि एका मर्सिडिझ बेंझ गाडीचा समावेश आहे.मेहूल चौक्सी हा भारतातून पसार झालेला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार तो सध्या अँटिंग्वा आणि बर्बुडामध्ये राहत असल्याची माहिती मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत तणाव

खुलासा! एका व्यक्तीच्या PF खात्यावर १०३ कोटी रुपये तर १.२३ लाख खात्यांमध्येच आहेत ६५,५०० कोटी