in

शरद पवारांचा राजकारणासाठी यू टर्न, पंतप्रधानांचा हल्लाबोल

लोकशाही न्यूज नेटवर्क | देशातील नवीन कृषी कायद्यांवर शरद पवार यांनी आधी मी सुधारणांच्या बाजूने असल्याचे सांगितले होते, त्यानंतर आता अचानक राजकारणासाठी यू टर्न घेतल्याची टीका मोदी यांनी शरद पवारांवर केली.

मोदी राज्यसभेत म्हणाले, शरद पवार यांनी कृषी कायद्यातील सुधारणांवर भाष्य केलं, शरद पवारांनी आताच सांगितलं, मी सुधारणांच्या बाजूने आहोत, आता अचानक राजकारणासाठी यू टर्न घेतला असल्याचे सांगत हल्लाबोल केला. यासाठी त्यांनी आपले स्वत:चे विचार सोडले असल्याचीही खरमरीत टीका केली.

शरद पवारांना सल्ला देताना मोदी म्हणाले, मनमोहनसिंग यांची तरी गोष्ट लक्ष ठेवायची, माझी नाही ठेवली तरी चालेल, तुम्हाला गर्व वाटायला हवा, मनमोहनसिंग यांनी जे म्हटलं ते मोदी करतायत असे ते म्हणत त्यांनी कॉंग्रेसलाही टोला लगावला.

१ लाख १५ हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला.आतापर्यंत १ लाख १५ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.तसेच बंगालचे शेतकरी जर यात जोडले गेले असते तर हा आकडा मोठा असता असेही मोदी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारतीय लोकशाही पाश्चिमात्य नव्हे, मानवी संस्था आहे – मोदी

SBI Alert : बँकेच्या सुरळीत व्यवहारांसाठी आताच अपडेट करा ‘ही’ माहिती