in

कोरोनाविरोधात पंतप्रधान छेडणार जनआंदोलन, देशाला देणार शपथ

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना विरोधात जनआंदोलन छेडणार वायरसपासून वाचण्यासाठी स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांकडून शपथ दिली जाणार आहे. देशात ६७ लाखाहून अधिक जण कोरोना वायरसच्या संपर्कात आलेयत. पण यातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. हिवाळा आणि त्यात आलेल्या सणांमध्ये कोरोना वेग वाढू नये यासाठी पंतप्रधान जनतेला आवाहन करणार आहे. मास्क वापरणे, दोन फुटांचे अंतर आणि सतत हात धुवण्याचा संदेश पंतप्रधान देणार आहेत.

कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ८५.०२ टक्क्यांवर पोहोचलीय. पंतप्रधानांच्या नव्या मोहिमेतून १३५ कोटी भारतीयांना कोरोना विरोधात लढण्याची शपथ दिली जाईल. देशवासिय कोरोनापासून स्वत: आणि कुटुंबाचा बचाव करण्याची शपथ घेतील.

दहावा व्यक्ती बाधित
‘जगभरात प्रत्येक दहावा व्यक्ती कोरोनोबाधित असू शकतो.’ WHO ने केलेल्या वक्तव्यानुसार, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या पॉझिटिव्ह असलेल्या एकूण संख्येच्या जवळपास २० टक्के अधिक असू शकते अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

जगभरात १० टक्के लोक कोरोनाबाधित आहेत. म्हणझे जगभरातील जवळपास ७६९० करोड लोकसंख्येत जवळपास ७६ करोड लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. WHO नुसार, जगभरात जवळपास ३.५ करोड लोकांना कोरोनाची लागण झाल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीत सांगितल्याप्रमाणे,’महामारीचा संसर्ग अजूनही होत आहे. तसेच संक्रमणापासून वाचण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या संक्रमणातून अनेकांचा जीव वाचला आहे.’ डॉ. रियान यांच्या म्हणण्यानुसार, साऊथ-ईस्ट एशियात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती जास्त बिघडलेली आहे. यूरोप आणि पश्चिमच्या भागात डेथ रेट सर्वाधिक आहे. तर आफ्रिका आणि पश्चिम देशात कोरोनामुळे परिस्थिती सकारात्मक आहे

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Mumbai Local | मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

Mumbai University | Onlineच्या घोळामुळे रखडलेल्या परीक्षा 19 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार