in

संसदेत प्रश्न विचारा, पण…; मोदींचं विरोधकांना आवाहन

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले. अधिवेशन सुरू होण्याआधी त्यांनी संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधला. संसदेचे हिवाळी अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. यामुळे संसदेचे हे अधिवेशन आणि येत्या अधिवेशनात देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या भावनेनुसार देशाच्या प्रगतीसाठी चर्चा व्हावी, अशी देशातील प्रत्येक नागरिकाची इच्छा असल्याचे ते म्हणाले. अशा स्थितीत हे सत्र दूरगामी परिणामांसह विचारांचे, सकारात्मक निर्णय घेणारे ठरते. संसद कशी चालवली गेली आणि किती चांगली चालवली गेली… हे भविष्यात लक्षात ठेवेले जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरकार प्रत्येक मुद्द्यावर खुल्या चर्चेसाठी तयार आहे. सरकार प्रत्येक प्रश्नोत्तरे व्हावीत आणि संसद शांततेत चालावी. सरकारच्या धोरणांविरुद्ध विरोधक आक्रमक होऊ शकतात. पण यावेळी त्यांनी संसदेची आणि सभापतींची प्रतिष्ठा राखावी. सर्वांनी संसदेत योग्य वर्तन करावे, ज्यामुळे देशातील पुढील तरुण पिढ्यांना ते कामी येईल, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Parliament Winter Session 2021: पंतप्रधान मोदींनी विरोधकांना केलं ‘हे’ आवाहन

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; पाहा आजचे नवे दर