लोकशाही न्यूज नेटवर्क
जागतिक शाश्वत विकास परिषद-2021 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. आज (बुधवार) सायंकाळी साडेसहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात मोदींच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार आहे. शाश्वत विकासाचं ध्येय गाठण्यासाठी या परिषदेत विचार मंथन होणार आहे.
भारताच्या एनर्जी आणि रिसोर्सेस इन्स्टिट्यूटद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात येतं. यंदा ही २०वी परिषद होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक देशांचे प्रमुख, अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, हवामान बदल तज्ज्ञ आणि पर्यावरणाशी संबंधित व्यक्ती या परिषदेत सहभागी होणार आहेत.
‘रिडीफायनिंग अवर कॉमन फ्युचर : सेफ अँड सेक्युअर एनव्हार्यनमेंट’ अशी यावर्षीच्या कार्यक्रमाची थीम आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावतील आणि संबोधित करतील.
Comments
Loading…