प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देशातल्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर कोरोना स्थितीबाबत बैठक घेत आहेत. देशात कोरोनाच्या वाढत्या नव्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. यावेळी ते लसीकरणाबाबतही दूरदृश्य प्रणाली द्वारे चर्चा करत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- कोरोनाच्या चाचण्यांची भूमिका महत्वपूर्ण
- रुग्णांची संख्या वाढली म्हणून राज्यांनी घाबरू नये
- कोरोना चाचण्या योग्य प्रकारे होणे आवश्यक
- कोरोना लसीकरणामध्ये भेदभाव नाही
- ११ एप्रिल महात्मा फुलेच्या जयंती पासून १४ एप्रिल पर्यंत लसीकरण उत्सव साजरा करूया
- ४५ वर्षावरील सर्वाना लसीकरणासाठी मदत करा
- लस बनवण्यासाठी संपूर्ण क्षमतेचा वापर करा
- एकाच राज्याला संपूर्ण लस देऊ शकत नाही
- महाराष्ट्राचे नाव न घेता मोदींचा सूचक इशारा
- लसीकरण झाल्यावर सुद्धा सावधान राहा
- लसीकरणात तरुणांनी पुढाकार घ्यावा
- राज्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी
- समाजातील मान्यवरांनी या मोहिमेमध्ये भाग घ्यावा
- संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही
Comments
Loading…