देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर यातच न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे. भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणीही प्रवेश करू शकणार नाही. भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या प्रवास्यांमधून २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण है भारताचे असल्याचे समजले आहे. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे तरआर्डेन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे.
Comments
Loading…