in

पुणे केमिकल आग दुर्घटना प्रकरण; पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखाची मदत जाहीर

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला लागल्याच्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अनेक नेत्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली. आता या प्रकरणात आगीत मृत्य पावलेल्या मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 2 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीमधील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत. तर, १९ कामगारांना वाचवण्यात यश आलं आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती समजताच पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करून, पुण्यातील एका कारखान्यात लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकास ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून’ 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. जखमी व्यक्तींना 50,000 रुपये भरपाई देण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये महाराष्ट्र अव्वल; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची धक्कादायक माहिती

वर्ध्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू