कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या लॉकडाउनवेळी मुंबईची लाईफलाईन लोकल बंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकल बंद करणे किंवा निर्बंध आणण्याबाबत संकेत दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग पाहता लोकल प्रवास बंद करण्याचा किंवा लोकल प्रवासावर निर्बंध आणण्याच्या विचारात असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबई महानगर क्षेत्रात लोकल गाड्यांमधील गर्दी कमी होत नसल्यानं त्यावरही निर्बंध आणण्याची चर्चा सुरू आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र, मुंबई परिसरात झपाट्यानं रुग्ण वाढत आहेत हे पाहता लोकलमधील गर्दी कमी करणं आवश्यक आहे, त्यातूनच लोकल पूर्ण बंद करावी की पूर्वी जसे कठोर निर्बंध घातले होते तसे पुन्हा घालावेत, यावर राज्य सरकार गांभीर्यानं विचार करत आहे, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
Comments
Loading…