in

कांद्याच्या चकत्या घराच्या कोपऱ्यात ठेवल्यास होईल ‘हा’ फायदा

Share

रोजच्या जेवणासोबत तोंडी लावायला कांदा हा हवाच. अनेक वेळा डोळ्यातून पाणी काढणारा कांदा केवळ पदार्थाची चवच वाढवत नाही, तर त्याचे अन्यही गुणधर्म आहेत. शरीरासाठी गुणकारी ठरणारा कांदा घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासही मदत करतो.

केसगळतीमध्ये किंवा केसात कोंडा झाल्यावर कांद्याच्या रसाचा वापर करतात. मात्र हवा शुद्ध करण्यासाठीही कांद्याचा उपयोग होतो हे फार कमी जणांना माहित आहे. कांद्यामध्ये बॅक्टेरिया मारण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे घरातील हवा शुद्ध करण्यासाठी कांद्याच्या चकत्या घराच्या कोपऱ्यात ठेवाव्यात.

घरातील वातावरण प्रसन्न राहण्यासाठी घरात कायम हवा खेळती राहिली पाहिजे. तसंच मुबलक प्रमाणात सुर्यप्रकाश देखील आला पाहिजे.मात्र काहींच्या घरात सुर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येत नाही. त्यामुळे सतत घरात अंधार जाणवतो. अशा ठिकाणी बॅक्टेरियाचं साम्राज्य लवकर पसरतं. त्यामुळे अशावेळी घरात कांद्याच्या चकत्या ठेवाव्यात.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव…

marathi historical show swarajya janani jijamata begins shoot in goregaon filmcity post lockdown

…आणि लॉकडाऊनंतर शूट सुरू करणारी ‘स्वराज्य जननी जिजामाता’ ठरली पहिली मालिका