in

नाशिक-मुंबई महामार्गाची चाळण… संपूर्ण रस्ता खड्डेमय!

पाऊस आणि खड्डे हे समीकरण जणू दरवर्षी ठरलेलेच असते. पावसाला सुरुवात झाली की अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली बघायला मिळते. मात्र नाशिक-मुंबई महामार्गाची 25 दिवसांपूर्वी दुरुस्ती करूनही दूरवस्था झाली असून प्रत्येक किलोमीटर अंतरावर छोटे-मोठे अर्धा ते एक फुटाचे खड्डे नजरेस पडत आहेत.

खास करुन पिंपरी फाटा, बोरटेम्भे, घोटी, वाडिवरहे या ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत? असाच प्रश्न प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. यासोबतच खड्ड्यात पाणीही साचल्याने या खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने वाहनांचं देखील मोठं नुकसान होत आहे.

याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे रोज छोटे-मोठे अपघातही खड्ड्यांमुळे होत आहेत. रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ind VS pak| भारतीय पत्रकाराचा प्रश्न इम्रान खान यांना झोंबला

गाव करी ते राव काय करी… बारामतीतील गावात २५९ शोषखड्डे