in

‘विठूचा गजर…’ करत अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केले फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा ती इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते.

नुकतेच तिने मराठमोळ्या साजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर मराठमोळ्या अंदाजातील फोटो शेअर विठूचा गजर..गुरुवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता.. फक्त झी मराठीवर.. सारेगमप लिटिल चॅम्प्स.. असे कॅप्शन दिला आहे.


या फोटोत मृण्मयीने पांढऱ्या रंगाची साडी, आंबाडा आणि त्यावर गजरा, नाकात नथ, कपाळावर चंद्राची कोर या सर्व गोष्टींनी तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. मृण्मयीचा मराठमोळा अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

SSC Result 2021 | दहावीचा निकाल उद्या घोषित होणार

डोंबिवलीत भीषण आग