in

फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सीताराम कुंटेंकडून राज्य शासनाला सादर

फोन टॅपिंग प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला. रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टपिंगसंदर्भातील हा अहवाल आहे.

बदली रॅकेटचा पर्दाफाश करणारा गोपनीय अहवाल आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनीी तयार केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे अर्थकारण असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यासाठी शुक्ला यांनी अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले होते. हे प्रकरण गंभीर असून, रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले, असा सवाल राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. कोणाचाही फोन टॅप करायचा असेल तर, त्याला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी आवश्यक असते. मात्र रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेतली होती का? असे विचारले असता, सीताराम कुंटे यांनी नाही असे उत्तर दिले होते, असेही ते म्हणाले होते.

तर आज दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी सीताराम कुंटे मुख्यमंत्री ठाकरे यांना अहवाल सादर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जाणून घ्या तुमचा Gmail पासवर्ड किती Apps आणि Web sites शी आहे लिंक

राज्यात कोरोना रुग्णाचा विस्फोट; पण रुग्णालयात रुग्णांना जागाच नाही