in

Pfizer : भारतात लशींच्या पुरवठ्यासाठी बोलणी सुरू – फायझर

भारतीय औषध महानियंत्रण संचालनालयाने (डीसीजीआय) फायझरच्या कोरोना लशीला विशेष चाचणीच्या नियमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. डीसीजीआयच्या निर्णयानंतर फायझर कंपनीने भारतामधील लसीकरण मोहिमेसाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकारबरोबर बोलणी सुरू असल्याचे म्हटले आहे.

लशींना मर्यादित वापरासाठी परवानगी मिळणार

आंतरराष्ट्रीय नियामक संस्थांनी ज्या कोरोना लशीला परवानगी आहे, अशा लशींना डीसीजीआय विशेष परवानगी देणार आहे. यामध्ये फायझर आणि मॉडर्नाचा समावेश होण्याची शक्यता आहे. देशामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढलेले असल्याने केंद्र सरकारकडून देशात लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

डीसीजीआयचे प्रमुख व्ही. जी. सोमानी म्हणाले, युएस एफडीए, ईएमए, युके एमएचआरए, पीएमडीए जपान, जागतिक आरोग्य संस्था या नियामक संस्थांकडून परवानगी मिळाली तर लशींना मर्यादित वापरासाठी परवानगी मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona;दिलासा! महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा उतरताच…

MP Sunny Deol Missing पोस्टर्स व्हायरल; भाजप खासदार सनी देओलला शोधणाऱ्यास कॉंग्रेस देणार बक्षीस