in

पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; पाहा आजचे नवे दर

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये गेल्या 26 दिवसांत कोणताही बदल झालेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. या दरांनुसार, आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. एकीकडे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट पाहायला मिळाली आहे. क्रूड ऑईलची किंमत 73 डॉलरच्या खाली पोहोचली आहे.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर
राज्यातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
पुणे 109.45 रुपये 92.25 रुपये

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संसदेत प्रश्न विचारा, पण…; मोदींचं विरोधकांना आवाहन

Parliament Winter Session 2021 | विरोधकांचा गदारोळ, राज्यसभेचंही कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब