in

Petrol-Diesel Price ;सलग 20 व्या दिवशी इंधन दरवाढ

Share

देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबता थांबत नाही आहे. आज सलग 20 व्या दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. त्यामुळॆ इंधन दरवाढीने सामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग विसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८६.९१ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.५१ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २१ पैशांची तर डिझेलच्या दरात १७ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ८०.१३ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.१९ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. गेल्या २० दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे.

शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग विसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८६.९१ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.५१ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८३.३७ रूपये प्रति लिटर आणि ७७.४४ रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८१.८२ रूपये प्रति लिटर आणि ७५.३४ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर ८२.७४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.२५ रूपये प्रति लिटरवर गेले आहेत.

इंधन दर

  • दिल्लीत पेट्रोलचे दर ८०.१३ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ८०.१९ रूपये प्रति लिटर आहे.
  • मुंबईत पेट्रोलचे दर ८६.९१ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७८.५१ रूपये प्रति लिटर आहे.
  • चेन्नईमध्ये पेट्रोलचा ८३.३७ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७७.४४ रूपये.
  • कोलकात्यातही पेट्रोल ८१.८२ रूपये प्रति लिटर आणि डिझेल ७५.३४ रूपये प्रति लिटर.
  • बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर ८२.७४ रूपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.२५ रूपये प्रति लिटर.

डिझेलच्या दरात १० रूपयांपेक्षा अधिक वाढ

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. सध्या इंडियन बास्केट कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होऊन ते ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास आलं आहे. गेल्या २१ दिवसांमध्ये डिझेलच्या दरात १०.७९ रूपयांची आणि पेट्रोलच्या दरात ८.८७ रूपयांची वाढ झाली आहे.


Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबईच्या ‘या’ भागात वाढतो कोरोना;पाहा रेड झोनची यादी

कार जाळायच्या का? जितेंद्र आव्हाड यांचा अमिताभ बच्चन यांना सवाल…