in

Petrol Diesel Price; सलग पंधराव्या दिवशी इंधन दरवाढ

Share

देशात पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही आहे. आज सलग पंधराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीती वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग पंधरा दिवसांपासून वाढ होतं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. तर डिझेलचे दर ७९ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.त्यामुळे कोरोना व लॉकडाउनमुळे आर्थिक मिळकतीवर परिणाम झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढला आहे.

पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाढलेल्या दरामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७९ रुपये ५६ पैसे इतके झाले आहेत. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलच्या दर वाढून ७८ रूपये ८५ प्रति लिटर इतके झाले आहेत.

  • इंधन दर
  • मुंबई पेट्रोल 86.36 तर डिझेल 77.24
  • दिल्ली पेट्रोल 79.56 तर डिझेल 78.85
  • चेन्नई पेट्रोल 82.87 तर डिझेल 76.30
  • कोलकाता पेट्रोल 81.27 तर डिझेल 74.14

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 21 जून ते शनिवार 27 जून 2020

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा