in

Petrol-Diesel Price | जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

बुधवारी सरकारी तेल कंपन्यांकडून या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे महिन्यामध्ये अवघ्या 17 दिवसांमध्ये पेट्रोल 4.17 रुपये आणि डिझेल 4.60 रुपये इतक्या फरकाने महागले आहे. दर दिवशी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर निर्धारित केले जातात. या दरांमध्ये एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाच्या किंमती इतक्या वाढतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे देशातील इंधनाचे दर निर्धारित होतात.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर (प्रती लीटर) किती ?

  • दिल्ली- पेट्रोल 94.49, डिझेल 85.38
  • मुंबई- पेट्रोल 100.72, डिझेल 92.69
  • चेन्नई- पेट्रोल 95.99, डिझेल 90.12
  • कोलकाता – पेट्रोल 94.50, डिझेल 88.23
  • बंगळुरु- पेट्रोल 97.64, डिझेल 90.51

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BCCI T-20 | बीसीसीआयला टिट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निर्णयासाठी मुदतवाढ

हाफकिनला कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी १५९ कोटी अनुदान