in

Petrol and Diesel price | अनेक दिवसांनंतर पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ नाही

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चांगलीच झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. मात्र आज पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.58 रुपये तर डिझेलची किंमत 88.60 रुपये इतकी आहे. गेल्या काही दिवसात आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. त्याचा परिणाम आपल्या देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्यावर होत आहे.वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्यातच आता तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्यांच्या निवडणूका आहेत.

महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो.आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की होते की, “इंधनाच्या वाढत्या किंमती या ग्राहकांवर परिणाम करतातच, त्याचसोबत सर्वच क्षेत्रावर त्यांचा परिणाम होतो. केवळ बाईक वा कार मालकांच्यावर याचा परिणाम होत नसून त्याचा परिणाम उत्पादन क्षेत्र, वाहतूक आणि इतरही क्षेत्रावर पडतोय.” मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनीही पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा सल्ला दिला होता. या अगोदर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही याबाबत सूचना केली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

अर्थसंकल्पीय अधिवेशन: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक