in

छोट्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका सुरू करण्यास परवानगी

कोरोना वैश्विक महामारीमुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (हौसिंग सोसायट्या) निवडणुका त्वरित सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.

राज्यात २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या ७० ते ७५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. या निवडणुका सोसायटीनेच घ्यायच्या आहेत.२५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार सहकार निवडणूक प्राधिकरणाऐवजी संबधित सोसायटीलाच देण्याचा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, त्यासाठीची नियमावली तयार नसल्याने निवडणुका कशा घ्यायच्या, असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर निर्माण झाला होता.ऑक्टोबर २०१९ मध्ये सहकार विभागाने निवडणुकीबाबतची नियमावली तयार करून त्यावर जनतेच्या हरकती- सूचना मागवल्या. त्यावर गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या प्रमाणात सूचना नोंदवल्या. त्यानुसार मूळ नियमावलीत अनेक सुधारणा करून अंतिम नियमावली फेब्रुवारी-मार्च दरम्यान मंजूर करण्यात आली.

कोरोनामुळे या निवडणुका तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. कोरोनाची लाट ओसरताच सहकार विभागाने काही दिवसांपूर्वीच २५० पेक्षा अधिक सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू करण्याचे आदेश दिले होते. आता २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून त्याबाबतचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने निर्गमित केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona | राज्यात ३ हजार ५८६ नवीन कोरोनाबाधित

जीएसटी बैठक; औषधांवर जीएसटी नसणार- अर्थमंत्री निर्मला सितारमण