in

गांधी परिवाराचे विश्वासू पीसी चाको यांचा राजीनामा

केरळ विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराचे विश्वासू राहिलेले पीसी चाको यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाको यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.

पक्षांतर्गत गटबाजीबाबतआपण पक्ष नेतृत्वाला कळवून थकलो आहोत. केरळ काँग्रेसमध्ये जे काही सुरु आहे, त्याबाबत पक्ष नेतृत्व फक्त बघ्याची भूमिका घेत आहे, अशी खंतही चाको यांनी बोलून दाखवत राजीनाम्याची घोषणा केली. चाको यांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

“मी केरळचा आहे तिथे काँग्रेस नावाचा कोणता पक्ष नाही. तिथे दोन पक्ष आहे. एक काँग्रेस (I), तर दुसरी काँग्रेस (A). या दोन पक्षांची एक ओऑर्डिनेशन कमिटी आहे, जी KPCC प्रमाणे काम करत आहे. केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. लोक पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याची वाट पाहत आहेत. मात्र, वरिष्ठ नेते गटबाजीत समाधान मानत आहेत. मी पक्ष नेतृत्वाकडे ही गटबाजी संपवण्याची विनंती केली आहे. पण पक्ष नेतृत्व मात्र दोन्ही गटांच्या प्रस्तावांवर सहमती दर्शवत आहे”, अशा शब्दात पीसी चाको यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ESIC Scheme 2021 : ESIC ची मोठी घोषणा, कर्मचार्‍यांना होणार मोठा फायदा

Gold Rate : पाहा सोन्याचे आजचे भाव